Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान 

0
Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

जालना,दि.२६: हर घर सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात भाजपा आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. काही लोकांनी सोशल मिडीयावर लोणीकर हे मोदींचे अंधभक्त आहेत अशी टीका केली होती. लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे. (Babanrao Lonikar’s Controversial Statement)

आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान | Babanrao Lonikar’s Controversial Statement

“तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले, तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत”, असं वादग्रस्त विधान लोणीकर यांनी केलं आहे. लोणीकर म्हणाले, “ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?”, असं वादग्रस्त विधान आमदार लोणीकर यांनी केले. 

Babanrao Lonikar's Controversial Statement

याआधीही लोणीकरांनी एका सभेत बोलताना ग्रामस्थांना इशारा दिला होता. विधानसभा निवडणुकीत लीड न मिळाल्याने लोणीकरांनी बोरगावात बोलताना म्हटले की, ‘5 वर्षांमध्ये कमळाचं एक बटन दाबायचं तेही केलं नाही. मी गावाला 8 कोटींचा सिमेंट रोड दिला. मला मत द्या किंवा नका देऊ. मी दोन-तीन वेळेस चव पाहणार, नाहीतर गावावर फुली मारणार.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here