मुंबई,दि.6: अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाकडे (Andheri East Bypoll Result 2022) संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपने आपला उभा केलेला उमेदवाराने अर्ज माघारी घेतला होता. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सहाव्या फेरीचा निकाल हाती आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पण, दुसरीकडे इतर उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त लोकांनी पसंती दिली आहे. शिवसेनेनं आरोपही केला होता की, नोटाला पसंती देण्यासाठी पैसे वाटण्यात आले होते. अजून दोन फेरींचा निकाल बाकी आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 32 टक्के मतदान झालं आहे. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. ऋतुजा लटके या सहाव्या फेरीमध्ये 21090 मत घेऊन आघाडीवर आहे. दुसऱ्या फेरीत मोजलेली मते ही मुरजी पटेल यांची नगरसेविका ज्या वॉर्डमध्ये होती, तेथील निम्याहून अधिक ईव्हीएम मशीन होती.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल
सहाव्या फेरीअंती एकूण
ऋतुजा लटके – 21090
बाळा नाडार – 674
मनोज नाईक – 398
मीना खेडेकर – 587
फरहान सय्यद – 448
मिलिंद कांबळे – 291
राजेश त्रिपाठी – 621
नोटा – 4338
एकूण – 28447
पाचव्या फेरीअंती एकूण
ऋतुजा लटके – 17278
बाळा नडार – 570
मनोज नाईक – 365
मीना खेडेकर – 516
फरहान सय्यद – 378
मिलिंद कांबळे – 267
राजेश त्रिपाठी – 538
नोटा – 3859
एकूण – 23771
चौथी फेरी. (4)
ऋतुजा लटके – 14648
बाळा नडार – 505
मनोज नाईक – 332
मीना खेडेकर – 437
फरहान सय्यद – 308
मिलिंद कांबळे – 246
राजेश त्रिपाठी – 492
नोटा – 3580
एकूण – 20548
तिसऱ्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते…
ऋतुजा लटके- ११३६१
बाला नाडार – ४३२
मनोज नाईक – २०७
मीना खेडेकर- २८१
फरहान सय्यद- २३२
मिलिंद कांबळे- २०२
राजेश त्रिपाठी- ४१०
नोटा -२९६७
एकूण मत : १६०९२
दुसऱ्या फेरीचा निकाल
ऋतुजा लटके- 7817
बाला नाडार – 339
मनोज नाईक – 113
मीना खेडेकवर- 185
फरहान सय्यद- 154
मिलिंद कांबळे- 136
राजेश त्रिपाठी- 223
नोटा -1470