नाशिक,दि.8: नाशिक औरंगाबाद महामार्गावर खासगी बस आणि टँकरच्या अपघातानंतर आग लागल्यामुळे बसमधील 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटना ताजी असतानाच वणी येथे पुन्हा द बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. सप्तशृंगी गडाकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी बसने अचानक पेट घेतला. काही कळण्याच्या आतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी भाविक सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
घटना ताजी असतानाच वणी येथे पुन्हा द बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. सप्तशृंगी गडाकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी बसने अचानक पेट घेतला. काही कळण्याच्या आतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी भाविक सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहे. स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, आज पहाटे खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. आरटीओ आणि पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. बसमध्ये ओव्हरलोड प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवासी बस ट्रकचा डिझेल टँकरवर आदळल्याने स्फोट होऊन बसला आग लागण्याची माहिती समोर आली आहे.