सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीचे दिवशी सुरू राहणार

0

सोलापूर,दि.17: जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये जनतेच्या सोयीसाठी दस्त नोंदणी तसेच इतर कार्यालयीन कामाकरिता दि.31 मार्च 2022 पर्यंत (18 मार्च 2022 धुलीवंदन वगळता) शनिवार दि.19 मार्च 2022 व शनिवार दि. 26 मार्च 2022 या शासकीय सुट्टीचे दिवशी सुरू ठेवण्यात येत आहे. तसेच दि. 31 मार्च 2022 पर्यंत या कार्यालयातील दस्त नोंदणीची वेळ सकाळी 09.45 ते रात्री 8.15 अशी दोन तासाने जादा वाढविण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे या ठिकाणी असेही स्पष्ट करण्यात येते की, जे पक्षकार दि. 31 मार्च 2022 पर्यंत दस्त निष्पादीत करून आवश्यक मुद्रांक शुल्क व नोंदणी फी चा भरणा ई-चलनाव्दारे दि. 31 मार्च 2022 पर्यंत करून ठेवतील त्यांचे दस्त पुढील चार 4 महिन्यापर्यंत संबंधीतास दस्त नोंदणीसाठी विनादंड स्विकारण्यात येतील व वार्षिक मूल्यदर तक्तामध्ये दरवाढ झाल्यास संबंधितास अतिरिक्त भूर्दंड बसणार नाही. त्यामुळे पक्षकार यांनी दस्त नोंदणी करिता कार्यालयात गर्दी न करता ई-स्टेपइनचा वेळ आरक्षण वापर करून दिलेल्या निर्धारित वेळेत आपल्या दस्ताची नोंदणी करून त्यांना होणारी गैरसोय टाळावी असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक गो.द.गीते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here