मुंबई,दि.30: Akash Thosar: अभिनेता आकाश ठोसरने थरारक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता फक्त आणि फक्त त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. सह्याद्री भटकंतीसाठी निघालेल्या आकाश याने खळखळत्या धबधब्याखाली स्टंटबाजी करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आकाश याने धबधब्याखाली रॅपलिंक करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला.
Akash Thosar | अभिनेता आकाश ठोसरने थरारक व्हिडिओ केला शेअर
व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘जय शिवराय…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आकाशच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.
एवढंच नाही तर रॅपलिंक करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी याबद्दल देखील अभिनेत्याने चाहत्यांना सांगितलं आहे. पोस्टमध्ये अभिनेता म्हणाला, ‘गिर्यारोहण हे साहसी क्षेत्र आहे.एखाद्या डोंगर सुळक्यावर Trekking, Climbing किंवा Rappelling करायची असेल तर, सर्वप्रथम एखादा Rope, Harness आणि safety equipment या साऱ्याची व्यवस्था करुन एखाद्या प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली Climbing किंवा Rappelling करावं.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘सदर विडिओ हा सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून एका प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली बनवण्यात आला आहे… कोणत्याही धोकादायक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीच व्यावसायिक सल्ला घ्यावा.’ सध्या सर्वत्र अभिनेत्याची पोस्टची चर्चा रंगली आहे.
आता आकाश ‘बाल शिवाजी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती रवी जाधव यांनी दिली आहे. आता चाहते देखील आकाश याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.