मुंबई,दि.31: Jaipur Express Firing: RPF कॉन्स्टेबलकडून चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूर- मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह 3 प्रवासी आहेत. आरपीएफच्या एका कॉन्स्टेबलने सगळ्यांवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान घडली. मीरा रोड बोरिवली दरम्यान जीआरपी मुंबईच्या जवानांनी या कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले. (Jaipur Express Firing)
RPF कॉन्स्टेबलकडून चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार | Jaipur Express Firing
जयपूर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक 12956) कोच क्रमांक बी 5 मध्ये ही घटना घडली. ही घटना आज पहाटे 5.23 वाजता घडली. आरपीएफ जवान आणि एएसआय दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. दरम्यान, कॉन्स्टेबल चेतनने एएसआयवर अचानक गोळीबार केल्याने प्रवासी प्रवाशांमध्ये गोंधळ पसरला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 31 जुलै 2023 रोजी सकाळी 5.23 वाजता, ट्रेन क्रमांक 12956 जयपूर एस मध्ये बी5 मध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली. ट्रेन बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचली आहे आणि ASI व्यतिरिक्त 3 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. वरिष्ठ डीएससी बीसीटी साइटवर येत आहेत. या जवानाला पकडण्यात आले आहे. डीसीपी उत्तर जीआरपीला माहिती देण्यात आली आहे.
प्रवाशांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग
या घटनेवेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, सुरुवातीला आम्हाला काहीच समजले नाही. ट्रेनमध्ये अचानक गोळीबार होऊ लागला. सर्वत्र गोंधळ उडाला. प्रवाशी ट्रेनच्या बोगीमधून इकडून तिकडे सैरावैरा पळू लागले. काही प्रवाशांनी त्यांच्या मुलांना लपवले तर काहींनी सामान घेऊन पळ काढला. एका प्रवाशाने म्हटलं की, जेव्हा फायरिंग झाली तेव्हा मी झोपलो होतो. अचानक गोळीचा आवाज आल्यानंतर मी घाबरलो. सुरुवातीला ट्रेनचा अपघात झाल्याचे वाटले. परंतु जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. मी घाबरलेल्या अवस्थेत होतो असं त्यांनी म्हटलं.
तर अचानक ट्रेनमधील प्रवाशांवर गोळीबार झाल्याने सर्वच प्रवाशी दहशतीत आले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे वाटले. हातात हत्यार घेऊन आरोपी गोळी चालवत होता. अनेकजण डब्यातून पळत होती. इतर बोगींमध्ये गोंधळ उडाला. गोळ्या लागलेले व्यक्ती खाली पडले होते असं एका प्रवाशाने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ही ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकावर आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. पोलिसांनी चारही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले. आरोपी आरपीएफ जवानाची बोरिवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.