नवी दिल्ली,दि.6: Ajit Pawar Vs Sharad Pawar: निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी कुणाची या कायदेशीर वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. अजित पवार गटानं पहिल्या दिवशी बाजू मांडली. अजित पवार गटाने मांडलेल्या युक्तीवादावर शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले आहेत. निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का दिला आहे. शपथपत्र बोगस असल्याचे शरद पवारांचे आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळले आहेत.
शरद पवार गटाचा दावा फेटाळला | Ajit Pawar Vs Sharad Pawar
अजित पवारांनी मृत व्यक्तीचे शपथपत्र जोडल्याचा दावा शरद पवार गटानं केला होता. यावर मृत व्यक्तीचे नव्हे तर त्यांच्या मुलाचे शपथपत्र जोडल्याचे अजित पवारांच्या वकीलांनी स्पष्ट केले. शपथपत्र बोगस नसल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवारांचा आक्षेप फेटाळला आहे. निवडणूक आयोगाने घेतलेली ही भूमिका शरद पवार गटासाठी मोठा झटका मानली जात आहे.
राष्ट्रवादी कुणाची वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत अजित पवार गटानं आपली बाजू मांडली तर शरद पवार गटाकडून अजित गटाच्या युक्तिवादावर प्रतिवाद करण्यात आला. विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान खुद्द शरद पवार निवडणूक आयोगासमोर उपस्थित होते. या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर धक्कादायक आरोप करण्यात आले.