पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, सोलापूर महानगरपालिका आणि रूपाभवानी देवस्थान यांच्या संयुक्त सहयोगाने आयोजित
सोलापूर,दि.6 : नवरात्र काळात भाविकांना देवी दर्शन करता यावे यासाठी ऑनलाईन पास प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दर्शनास येण्यास इच्छुक भाविकांनी ऑनलाईन पास बुकिंग करून स्वतःचे दर्शन पास काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री रूपा भवानी देवस्थान, श्री शिवगंगा मंदिर देवस्थान, श्री विश्व ब्राह्मण समाज कालिका मंदिर, हिंगुलांबिका मंदिर, कालिका मंदिर पाच्चा पेठ, शिवलाड तेली समाज शुक्रवार पेठ
पास काढण्यासाठीची प्रक्रिया
1.दर्शन पास काढण्यासाठी भाविकांनी कोव्हिशील्ड/कोवक्सीन या लसीचे 2 डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे.
2.दर्शनास येताना सोबत लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि तसेच स्वतःचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
3.भाविकांनी या http://www.shrirupabhavanidevasthan.com दिलेल्या लिंकवर क्लिक करून दर्शन संकेतस्थळावर जावे, तिथे दर्शनासाठी आवश्यक असणारे सर्व नियम दिलेले आहे, ते वाचून भाविकांनी त्या खाली दिलेले दर्शन पास चे फॉर्म भरावे.
4.भाविकांना फॉर्ममध्ये देवस्थान, दर्शनाची तारीख, दर्शनासाठीचे वेळ निवडायचे आहे आणि त्याखाली स्वतःचे व दर्शनासाठी सोबत येणाऱ्या भाविकांची माहिती भरायची आहे.
5.माहिती पूर्ण भरून झाल्यांनतर सबमिट करावे जे पास दिसेल त्या पासचे स्क्रिन शॉट काढून घ्यावे आणि दर्शनास आल्यानंतर ते स्क्रिन शॉट दाखवणे आवश्यक आहे.
6.ज्या इच्छुक तारखेस आपण दर्शनास जाणार आहे त्या तारखेच्या दोन दिवस अगोदर आपण दर्शन पास बुकिंग करू शकता.
भाविकांसाठी नियम
सर्व भाविकांनी खालील नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्तालय व महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
भाविकांनी जेष्ठ व्यक्ती व लहान मुलांना आणू नये.
भाविकांनी मास्क चा वापर करणे आवश्ययक आहे.
भाविकांनी सामाजिक अंतर(सोशल डिस्टेंसिंग) चे नियम पाळावे.
भाविकांनी 2 कोविड लस – कोव्हीशील्ड किंवा कोवॅक्सीन घेतलेले असणे आवश्यक आहे व त्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
भाविकांजवळ आधार कार्ड/ पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार आयडीचे कोणतेही १ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. भाविकांनी कमीतकमी ६ फूट अंतर इतरांपासून पाळावे.
भाविकांनी पासमध्ये दर्शनासाठी निवडलेल्या वेळेत दर्शन घ्यावे. निवडलेल्या वेळेनंतर प्रवेश दिले जाणार नाही
Rupabhavani la chalat jat ahe
Setalment free colny no.1
🙇🙇♂️🙇♂️🙇♀️🙏🏼
🙇🙇♂️🙇♂️🙇♀️🙏🏼
I want darshan ticket
Darshan pass
I want online ticket
Rupa bavani darsan tikit