चेन्नई,दि.19: Actor Vijay Antony Daughter: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि संगीतकार विजय अँटोनीच्या (Vijay Antony) 16 वर्षीय मुलगी मीराने आत्महत्या केली आहे. राहत्या घरातच तिने आयुष्य संपवलं आहे. विजय अँटोनीची लाडकी लेक मीराने (Vijay Antony Daughter Meera Suicide) मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास चेन्नईतील अलवरपेट येथील राहत्या घरी गळफास घेतला आहे.
मीरा अँटोनी चेन्नईमधील अलवरपेट येथे राहत्या घरी पहाटे 3 वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मीरा तणावाखाली होती. तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मीरा ही बारावीत होती. चेन्नईतील एका लोकप्रिय महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. विजय अँटोनी हे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील मोठं नाव आहे. विजय हा अभिनेता असण्यासोबत संगीतकार आणि निर्माताही आहे. विजयच्या पत्नीचे नाव फातिमा असून तिचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे. विजय आणि फातिमा यांना मीरा आणि लारा या दोन मुली आहेत. आता मीराने आत्महत्या केली आहे.
मीरा अँटोलीच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मीरा अँटोलीच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मीराने आत्महत्या केली यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. लहान वयात अभिनेत्री अशा कोणत्या तणावात होती, मीराने आयुष्याचा शेवट का केला असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. अभिनेते विजय यांच्या काही जवळच्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची माहिती देत दु:ख व्यक्त केलं आहे.