सोलापूर,दि.12: सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने 1 एप्रिल ते 1 डिसेंबर या कालावधीमध्ये झालेल्या विविध कारवाईत 443 बसेस अवैध आढळून आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थी वाहतूक करणार्या एकूण 573 बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 443 बसगाड्या दोषी आढळल्याने त्यांच्याकडून एकूण दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोलापूर शहरामध्ये विद्यार्थी वाहतूक करणार्या बसगाड्यांची संख्या मोठी आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांमध्ये 336, डिसेंबरमध्ये 107 अशा स्वरूपात एकूण 443 बसगाड्या परिवहन विभागाच्यावतीने तपासण्यात आल्या. तपासण्यात आलेल्या 16 पैकी चार स्कूल बसगाड्या अवैध आढळून आल्या. या कारवाईत परिवहन विभागाला दोन लाखांचा महसूल मिळाल्याचे सह प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी सांगितले.
एप्रिल ते डिसेंबर या नउ महिन्यांमध्ये एकूण 573 रिक्षा तपासण्यात आल्या. यामध्ये चारच रिक्षा अवैध आढळून आल्या. सदर रिक्षा चालकांना नियमावली समजावून सांगून समज देण्यात आली आहे. वास्तविक पाहता शहरांमध्ये नोंदणीकृत हजारो रिक्षा आहेत. बिगर नोंदणीच्या त्याहीपेक्षा जास्त आहेत.