सोलापूर,दि.२४: न्यायालयाने बलात्काराप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की, मौजे देवडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील रहिवासी नामे राजेश उर्फ राजेंद्र श्रीरंग जाधव यांचेविरुध्द पिडितेने वेळोवेळी तिच्या इच्छेविरुध्द शारिरिक संबंध ठेवल्याची तक्रार दि. १०/०३/२०१५ रोजी मोहोळ पोलीस स्टेशन येथे दिली. त्याप्रमाणे संबंधित पोलीसांनी सदर गुन्हयामध्ये तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरचा खटला सत्र न्यायाधीश, सोलापूर के. डी. शिरभाते यांच्याकडे चालला. सदर खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण ७ साक्षीदार तपासले. सदर साक्षीदारांपैकी पिडिता (फिर्यादी), फिर्यादीची मावशी तसेच वैदयकिय अधिकारी यांची उलटतपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली.
अत्त्याचारप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर यांनी उलटतपास घेतेवेळी अनेक महत्वाच्या बाबी न्यायालयासमोर आणल्या. त्यातल्या काही बाबी म्हणजे, सदर खटल्यातील साक्षीदार व फिर्यादी हे सदर आरोपीचे राजकीय विरोधक होते तसेच सदर आरोपीने तात्कालीन ग्रामपंचायतीच्या कारभाराविरुध्द अनेक प्रश्न उपस्थित केले होते व त्याप्रमाणे अनेक तक्रारी अर्ज शासन दरबारी दाखल करुन त्याचा पाठपुरावा सुध्दा केला होता. तसेच सदर पिडितेने तथाकथित बलात्काराच्या घटनेनंतर सदरची बाब कोणालाही सांगितली नाही व सदर पिडिता व सदर खटल्यातील साक्षीदारांविरुध्द यातील संशयित आरोपी राजेश जाधव यांनी सदरची फिर्याद दाखल होण्यापूर्वी मारहाणीचा गुन्हा मोहोळ पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला होता.
सदर खटल्यातील अंतिम सुनावणी वेळी आरोपी तर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, यातील पिडित महिलेचे तथाकथित बलात्कारानंतरची वर्तणूक हि संशयास्पद आहे कारण अशा भयंकर घटनेनंतर पिडितेने सदरचा प्रकार जवळच्या कोणाला तरी सांगणे अत्यंत गरजेचे होते पण सदरची बाब कोणासही न सांगणे हे पिडितेचे नैसर्गिक वर्तणूक नसून संशय निर्माण करणारी बाब आहे. तसेच सदर संशयित आरोपी राजेश जाधव यांनी सदर पिडित महिला व इतर साक्षीदारांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर लगेच सदर बलात्काराचा गुन्हा दाखल होणे याला योगायोग म्हणता येणार नाही. तसेच सदर संशयित आरोपी व सदर खटल्यातील साक्षीदारांमधील राजकीय तेढ हे सुध्दा सदर बलात्काराच्या खोटया गुन्हयाचे कारण असू शकते.
सदरचा आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी राजेश श्रीरंग जाधव राहणार देवडी ता. मोहोळ यांची सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. हनुमंत टेकाळे, ॲड. औदुंबर तीर्थकर, ॲड. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.