सांगली,दि.5: Accident On Pune Bangalore Highway: पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर (Pune Bangalore Highway) सांगली जिल्ह्यातल्या कासेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात (Accident) एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि कंटेनरची धडक झाल्यामुळे हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
सर्व मृत हे जयसिंगपूर येथील आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कासेगावजवळ कारने कंटनेरला मागून जोराची धडक दिली. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीघांचा रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. शनिवारी दुपारी हा अपघात झाला आहे.
हा अपघात रात्री घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कराड तालुक्यातून पुढे काही अंतरावरच्या कासेगावजवळ हा अपघात झाला. येवलेवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कंटेनरला पाठिमागून एमएच 14 डीएन 6339 हा क्रमांक असलेली कार जोरात धडकली. या अपघातात अरिंजय अण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरू अभिनंदन शिरोटे यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील दोघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आली. तसेच, इतर तीन जणांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू ओढवला आहे.