Weather Today: देशातील या राज्यात येणार थंडीची लाट, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना इशारा

0

दि.२९: Weather Today: उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी (North India Cold Wave) आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, उत्तराखंडसह अनेक राज्यांना थंडीचा फटका बसला आहे. गत दिवसाच्या काही भागात दुपारनंतर काही प्रमाणात सूर्यप्रकाश पडत असला तरी वातावरण थंड आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवीन अलर्ट जारी केला आहे. आजपासून देशातील या भागात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होणार आहे. इथं केवळ तापमानात घट होणार नाही, तर २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊसही पडू शकतो असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा

गेल्या आठवडाभरापासून राज्यात कडाक्याची थंडी आहे. तापमानात मोठी घट झाल्याने थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, पुणे, धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये थंडी आणखी वाढू शकते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात ताशी १०-२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे या भागाचे तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने खाली येऊ शकते. मध्य प्रदेशातील एकाकी भागात थंडीची लाट कायम राहील. याशिवाय छत्तीसगड आणि विदर्भातही तापमानात घट नोंदवली जाईल.

दरम्यान, पुढील काही दिवस विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here