सोलापूर,दि.23: राष्ट्रवादीचे नेते सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांच्यावर अत्त्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका शिक्षिकेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षिकेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सपाटेंवर खंडणीचा, अनैसर्गिक अत्याचार अन् अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला ही विधवा आहे. संस्थेतल्या शिक्षिकेसोबत जवळीक साधत, तिला लग्नाचे आमिष दाखवत,तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार केल्याचा आरोप सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर आहे.
शिक्षिकेने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणेही गाठले होते, त्यानंतर तिच्यावर दबाव आणत तक्रार मागे घेण्यास सांगितले.तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत सपाटेंनी शारीरिक संबंध ठेवले.तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकेन,तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, असे सांगत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पिडित महिलेची इच्छा नसतानाही तिच्याकडून राजीनामा लिहून घेतला. निवृत्तीचे पैसे देण्यासाठी व जमिनीच्या व्यवहारातील असे एकूण दहा लाख रुपये जबरदस्तीने घेतले, अशी तक्रार या महिलेने केली आहे.
तिच्या तक्रारीवरून राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने याबाबत विरोध करत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनला गेल्यानंतर तिला आरोपी सपाटे यांनी गावठी बंदूक दाखवत भावाला आणि त्यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देत तक्रार मागे घेण्यास सांगितले, असे फिर्यादीत नमूद आहे.