Majeed Memon On PM Modi: माजी खासदार माजीद मेमन यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कौतुक

0

दि.२८: Majeed Memon On PM Modi: माजी खासदार माजीद मेमन (Majeed Memon) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली जात असताना राष्ट्रवादीच्या माजी खासदाराने मोदी यांची स्तुती केली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप या संघर्षाने टोक गाठलं आहे. दोन्ही बाजूचे नेते दररोज एकमेकांवर आरोपांची राळ उठवत आहे. अशातच राष्ट्रवादीचे माजी खासदार माजी मेमन (NCP Majeed Memon) यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. माजीद मेमन यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगू लागली आहे.

‘जर नरेंद्र मोदी हे जनमत जिंकत असतील आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून दाखवले जात असतील तर त्यांच्यामध्ये नक्कीच काही गुण असतील किंवा त्यांनी काहीतरी चांगलं काम केलं असेल जे शोधण्यात विरोधी पक्षातील लोकांना अपयश येत आहे,’ असं माजीद मेमन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

घरचा आहेर

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर ईडीसह विविध तपास यंत्रणांनी कारवाईचा फास आवळला आहे. केंद्र सरकार सूडबुद्धीतून ही कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या माजी खासदाराने नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या ट्वीटने संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

केंद्र सरकारवर साधला होता निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उथळलेल्या स्तुतीसुमनांमुळे चर्चेत आलेल्या माजीद मेमन यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारवर घणाघाती टीकाही केली होती. ‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने खालची पातळी गाठली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी ईडीचा वापर केला जातो,’ असा हल्लाबोल मेमन यांनी केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here