दि.27: Attack On Bihar CM Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांच्यावरील हल्ल्याचे प्रकरण समोर आले आहे. पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये रविवारी एका तरुणाने मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पकडले आहे. या व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचं सांगण्यात येत आहे. Attack On Bihar CM Nitish Kumar
मुख्यमंत्री नितीश यांच्यावर हल्ला (Attack On Bihar CM Nitish Kumar) करणाऱ्या तरुणाचे नाव शंकर कुमार उर्फ छोटू असे असून तो बख्तियारपूरमधील मोहम्मदपूरचा रहिवासी आहे. शंकर कुमार बख्तियारपूरमध्येच सोन्या-चांदीचे दुकान आहे, असे सांगितले जाते. आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन गुप्त ठिकाणी नेले असून तेथे त्याची चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते. यादरम्यान ते एका मूर्तीला हार घालण्यासाठी पुढे गेले असता त्याचवेळी जमावातील एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनी लगेच या अज्ञात हल्लेखोराला ताब्यात घेतलं.
सीएम नितीश कुमार यांच्या संरक्षणात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पकडले. पाटणा पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे पथक तरुणाची चौकशी करत आहे. त्याला कुठे नेण्यात आले याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.