सोलापूर,दि.15: शनिवार दि. 12 मार्च रोजी दुपारी चार वाजता श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्रिन्सिपल गजानन धरणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
त्यानंतर संगीत शिक्षिका श्रुती व इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनीनी स्वागतगीत खूप सुंदर रित्या सादर केले. शिक्षिका श्रुती मंगळुरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शाळेच्या शिक्षिका रेणुका आरोरा यांना जैन सोशल ग्रुप तर्फे नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. मिहीर अडसूळ, अभिनव सुरपुरकर, श्रावणी नष्टे, वृंदा माने, आसावरी डांगे, रेणुका कुंगुलवार, अनिरुद्ध वडतीले, या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर, पर्यवेक्षक बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. सोनाली कलशेट्टी, नीता तमशेट्टी, सीमा मोहोळकर, सोमशेखर भोगडे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी चार सूत्रे विद्यार्थ्यांना सांगितली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयालक्ष्मी नष्टे यांनी आपल्या उत्कृष्ट शब्द सुमनाने केले तर अश्विनी जाधव यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.
