दि.6: IND vs SL: Ashwin Test Record: माजी क्रिकेटपटू कपिल देवचा (Kapil Dev) रेकॉर्ड रविचंद्रन अश्निनने (R Ashwin) मोडला आहे. कपिल देवचा 434 विकेट घेण्याचा विक्रम अश्विनने 435 विकेट घेत आपल्या नावे केला आहे. आर अश्विनने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. रविचंद्रन अश्निनने कसोटी क्रिकेटमध्ये 435 विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत त्याने कपिल देवला (Kapil Dev) मागे टाकले आहे. श्रीलंकन खेळाडू चरिथ असलंकाची विकेट अश्विनच्या कसोटी क्रिकेटमधील 435 वी विकेट ठरली आहे. त्याच्या मागोमाग कपिल देव 434 विकेटसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सर्वाधिक 619 विकेट अनिल कुंबळेच्या नावे आहेत.
अनिल कुंबळे अव्वल
आतापर्यंत कपिल देव भारताचे दुसरे सर्वात यशस्वी गोलंदाज होते. पण, आता अश्विन दुसरा यशस्वी गोलंदाज बनला आहे. सध्या माजी गोलंदाज अनिल कुंबळे 619 विकेटसह भारताचे कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत. दरम्यान,पहिल्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. भारताने पहिला डाव 8 बाद 574 धावा करून घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात केवळ 174 धावाच करू शकला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला.
अश्विन 9व्या क्रमांकावर
भारताचे माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्यांनी 23 वेळा 5 विकेट्स आणि दोन वेळा 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तर, आर अश्विनची ही 85वी कसोटी आहे. त्याने आतापर्यंत 435 विकेट घेतल्या आहेत. यात त्याने 30 वेळा 5 आणि 7 वेळा 10 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन सध्या 9व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 800 बळींसह अव्वल स्थानावर आहे.