रांची,दि.21: Lalu Prasad Yadav Fodder Scam: चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांना 60 लाखांचाही दंड ठोठावण्यात आला आहे.
लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून 139.35 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने दोरांडा चारा घोटाळा (Fodder Scam) प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.
लालू यादव यांच्यासह या प्रकरणातील 38 दोषींनाही सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावली. 15 फेब्रुवारीला सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी यांनी या सर्वांना दोषी ठरवले आणि शिक्षेवरील सुनावणीसाठी 21 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती.
यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी 41 जणांना दोषी ठरवून 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील सुनावणी निश्चित केली होती. आज यापैकी 38 जणांना शिक्षा होणार आहे. अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ज्या 38 जणांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे, त्यापैकी 35 जण बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. तर लालू प्रसाद यादव, डॉ. के.एम. प्रसाद आणि यशवंत सहाय यांना प्रकृतीच्या कारणास्तव राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आलं आहे.दि.21: