Geeta Rawat: CBIने AAPच्या नगरसेविकेला लाच स्वीकारताना केली अटक, शेंगा व्यापाऱ्यामार्फत घेत असे लाचेची रक्कम

0

नवी दिल्ली, दि.19: CBIने आम आदमी पार्टीच्या (AAP) नगरसेविकेला लाच स्वीकारताना अटक केली आहे. गीता रावत (Geeta Rawat) असे अटक करण्यात आलेल्या नगरसेविकेचे नाव आहे. आपच्या नेत्या आणि नगरसेविका गीता रावत यांनी 20 हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेंगा विकणाऱ्या व्यक्तीकडून हा पैसा गीता रावत यांच्याकडे पोहोचविण्यात आला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या विधानसभाक्षेत्र पटपडगंज येथील विनोद नगर वार्डातून गीता रावत यांना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारी सीबीआयने पूर्व दिल्लीतील वॉर्ड क्रमांक 217/10E पश्चिम विनोद नगर येथील नगरसेविका गीता रावत यांच्यावर ही कारवाई केली. गीता रावत भुईमूग शेंगा व्यापाऱ्याच्या माध्यमातून लाच घेत असत.


‘आता तुम्हाला कळेल की आम्ही कोण आहोत?’

शेंगा विक्रेत्याचे वडील सनाउल्ला यांना आपल्या मुलाला कोणीतरी पकडून ठेवल्याचे समजताच ते नगरपालिकेच्या कार्यालयात धावले, तेथे त्यांनी माझ्या मुलाला का पकडले आहे, अशी विचारणा केली. तेव्हा तेथे उपस्थित नागरी वेशातील लोकांनी आम्ही सीबीआयचे आहोत, तुमच्या मुलाला आम्ही का पकडले हे आता तुम्हाला समजेल, असे सांगितले. त्यानंतर लाचेची रक्कम सनाउल्लाच्या माध्यमातून नगरसेविका गीता रावत यांच्याकडे जात असल्याचे शेंगदाणा विक्रेत्याच्या वडिलांना समजले.

दोघांनाही रंगेहाथ अटक

सीबीआयने नोटांना रंग देऊन शेंगदाणा विक्रेत्याला पैसे दिल्याचे सांगण्यात आले, हीच नोट गीता रावत यांच्यापर्यंत पोहोचल्यावर सीबीआयने दोघांनाही रंगेहाथ पकडले. त्यानंतर नोटांची तपासणी केली असता त्याच रंगाच्या नोटा जप्त करण्यात आल्या. पुढील कारवाईसाठी, सीबीआयने आता आरोपी शेंगा विक्रेता सनाउल्ला आणि कॉर्पोरेशनच्या नगरसेवक गीता रावत यांना त्यांच्यासोबत कार्यालयात नेले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here