MP: खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना अश्लिल व्हिडिओ पाठवणाऱ्याला राजस्थानमधून अटक, दोन्ही आरोपी सख्खे भाऊ

0

दि.१५: MP: भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांना फोनवर अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही सख्खे भाऊ असून ते राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

रवीन खान आणि वारिस खान अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही अनेक दिवसांपासून अशा घटना करत होते. पोलिस दोघांची चौकशी करत आहेत.

वास्तविक, भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी 6 फेब्रुवारी रोजी शहरातील टीटी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रात्री उशिरा दोन अनोळखी क्रमांकावरून अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. फोनवर एक मुलगी कपडे काढत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकीही साध्वीला देण्यात आली होती.

हे प्रकरण संवेदनशील असल्याने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिसांनी दोन्ही मोबाईल नंबर ट्रेस केले असता दोन्ही नंबर राजस्थान जिल्ह्यातील भरतपूरचे असल्याचे समोर आले. मोबाईल क्रमांकांचे लोकेशन मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने राजस्थान पोलिसांना माहिती दिली. राजस्थान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्याची माहिती भोपाळ गुन्हे अन्वेषणला दिली. दोघेही आरोपी नात्यातील सख्खे भाऊ निघाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here