इंदूर,दि.28: Bhaiyyu Maharaj: भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) आत्महत्या प्रकरणी इंदूर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने तीन जणांना दोषी ठरवले आहे. इंदूर जिल्हा न्यायालयाने विनायक, चालक शरद आणि शिष्य पलक यांना दोषी ठरवले आहे. तिघांनाही प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी त्यांच्याजवळ परवाना असलेल्या रिव्हॉल्वरने आत्महत्या केली होती. भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले. न्यायालयाने शिष्य पलक, शरद आणि विनय यांना आयपीसी कलम 306 अंतर्गत दोषी ठरवले आहे. यामध्ये पलक ही त्यांची शिष्या आहे. त्याचवेळी विनायक त्यांचा नोकर होता आणि शरद चालक होता.
इंदूरमधील भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी या तीन आरोपींना जानेवारी 2019 मध्ये अटक केली होती. त्यानंतर हे तिघे मिळून महाराजांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत असल्याचे समोर आले होते. भैय्युजी महाराजांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेखही केला कारण ते भय्यूजींचे 16 वर्षांपासून एकनिष्ठ सेवक होते.