मुंबई,दि.23:e commerce company vs mobile retailers: ई कॉमर्स कंपन्या (e commerce company) व मोबाईल कंपन्यांच्या (mobile company) चुकीच्या व्यापार धोरणाविरोधात देशभरातील मोबाईल रिटेलर्स आक्रमक झाले आहेत. कंपन्या व ई कॉमर्स कंपन्या मिळून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर (Online Platform) जाणुनबुजून कमी किंमतीत मोबाईल (Mobile) उपलब्ध करून देत रिटेलरना (Retailor) उध्वस्त करण्याचे काम करीत आहेत. येत्या 26 जानेवारीलाही प्रजासत्ताक दिनानिमित्त अशाच सेलचे आयोजन केले जाऊ शकते. याला देशभरातील रिटेलर्स विरोध दर्शवणार असून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील किंमतीतच रिटेलर्स मोबाईलची विक्री करून त्यांना होणारे नुकसान डेबिट नोट द्वारे मोबाईल डिस्ट्रीब्युटरवर सोपवणार आहेत. (e commerce company vs mobile retailers)
सर्व मोबाईल रिटेलर्सनी एकजुटीने कंपन्यांना धडा शिकवुण ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या निर्णयाला पाठबळ द्यावे आणि स्वतःचा व्यवसाय वाचविण्यासाठी लढा द्यावा असे आवाहन असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, उपाद्यक्ष महेश चिंचोळी, झोनल उपाद्यक्ष सचिन पत्तेवार, रवींद्र कोळी यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील सहा सात वर्षांपासून मोबाईल कंपन्यांनी ऑनलाईन पोर्टल्स सोबत अनुचित व्यवसाय नीती अवलंबली आहे.
हेही वाचा Urfi Javed On Puspha: पुष्पाच्या गाण्यावर उर्फी जावेदचा किलर परफॉर्मन्स, साडीत सौंदर्य खुलले
रिटेलर्सना मोबाईल हँडसेट मॉडेलचा पुरेसा स्टॉक दिला जात नाही. त्याचवेळी ई कॉमर्सला भरपूर साठा दिला जातो. एकाच मॉडेलचे दर, ऑफर्स, स्कीम द्वारे ऑनलाईन व ऑफलाईन वेगवेगळे ठेवले जातात. यामुळे पारंपरिक भारतीय रिटेलेर्सचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी ऑल इंडिया मोबाईल रिटेलेर्स असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. समान व्यापार धोरण राबवावे यासाठी सातत्याने लढा दिला जात आहे. यासाठी आता देशभरातील किरकोळ मोबाईल विक्रेते ब्रँड्स वितरकांना फरकाची डेबिट नोट देऊन समानता राखतील. याबाबतचे पत्र सर्व कंपनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
हेही वाचा UP Election: आग्राच्या व्यक्तीने 94 वेळा निवडणूकीत पराभूत होऊन केला विक्रम, शतक करण्याची ईच्छा
ई-कॉमर्स पोर्टल्स प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ऑफर्स घेऊन येण्याची तयारी करीत आहेत. ई कॉमर्स पोर्टल प्रजासत्ताक दिनापूर्वीच विक्री सुरू करून रिटेलर्स व्यवसायाला अधिक नुकसान करण्याच्या तयारीत आहेत. कोविड महामारीमुळे कोलमडलेले अर्थकारण, वारंवार लागू होणारे निर्बंध यामुळे आधीच रिटेलर अडचणी आले आहेत. त्यात कंपन्यांकडून होणारा स्टॉकचा कमी पुरवठा होतो. विशेषत:10 हजारांखालील किंमतीच्या हँडसेट्सचा पुरवठा अतिशय कमी आहे. ईकॉमर्स पोर्टल्सना कंपनीकडून भरपूर स्टॉक दिला जातो. ई कॉमर्स कंपन्या रिटेलर्सच्या खरेदी किंमतीपेक्षा कमी किंमतीत भरघोस सवलती देऊन, झटपट कॅश बॅक देत विक्री करतात.
यामुळे रिटेलरचा व्यवसाय अडचणीत येत असताना कंपन्या बघ्याची भूमिका घेतात. या प्रकारामुळे अनेक रिटेलर्सनी व्यवसाय बंद केले असून अनेक जण त्या तयारीत आहे. त्यामुळे आता मोबाईल विक्रेते अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहेत. किरकोळ विक्रेते त्यांचा व्यवसाय वाचवण्यासाठी प्रतिकार करतील आणि त्यानुसार कृती करतील आणि निर्णायक निर्णय घेतील. AIMRA (All India Mobile Retailer Association) सोलापूर शहर व जिल्हा असोसिएशननी सर्व वितरकांना डेबिट नोट चे पत्र प्रत्यक्ष देऊन वितरकांशी चर्चा केली आहे. या वेळी जिल्हा अधक्ष प्रफुल्ल सादिगले, उपाधक्ष राजाभाऊ कांबळे, अन्य तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व शहरातील राजू बिराजदार, गणेश काटे, सचिन पाटील, रमेश भोसले हे ही उपस्थित होते. किरकोळ विक्रेते ऑनलाईन व ऑफलाईन किंमतीच्या फरकाने वितरकांना डेबिट नोट जारी करतील. लवकरच वितरकांच्या कार्यालयात जाऊन निषेध नोंदवणार असून पत्र सुपूर्द करणार आहेत. सर्व ब्रॅण्डसनी दोन्ही पद्धतीच्या विक्रेत्यांचा समतोल राखावा आणि समान वागणूक द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.