Home देश कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांचे मोठे विधान, म्हणाले मॅच अतितटीची वाटावी,...

कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांचे मोठे विधान, म्हणाले मॅच अतितटीची वाटावी, यासाठी…

0

मुंबई,दि.२५: निवडणूक आयोगातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे (Cockroach Janta Party) नेते अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगावर निशाणा साधतानाच त्यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, ‘अस्तित्व गमावण्याच्या भीतीपोटीच विरोधी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत,’ असा टोला लगावला आहे.

सोशल मीडियाद्वारे विरोधकांना सुनावताना दिपके म्हणाले की, निवडणुकीत हेराफेरी होत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही विरोधी पक्ष त्यात सहभागी होत आहेत. यामुळे या सदोष निवडणूक प्रक्रियेला एकप्रकारे कायदेशीर मान्यता मिळते आणि निवडणुका निष्पक्ष सुरू असल्याचा आभास निर्माण होतो.

“आमदार-खासदार फोडून पक्ष उद्ध्वस्त केले जात आहेत आणि मतांची उघड चोरी होत आहे. अशा परिस्थितीत केवळ व्यवस्थेत टिकून राह धडपडणे म्हणजे राजकीय अस्तित्व नाही,” असे सांगत त्यांनी विरोधकांना ‘तुम्ही नक्की किती काळ असे टिकून राहणार?’ असा रोखठोक सवाल विचारला.

या प्रक्रियेची क्रिकेटमधील फिक्सिंगशी तुलना करताना दिपके यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले की, क्रिकेटच्या फिक्स मॅचमध्ये प्रेक्षकांचा विश्वास टिकावा आणि सामना खरा वाटवा, यासाठी प्रत्येक कॅच सोडला जात नाही; तर सामना शेवटच्या षटकापर्यंत ताणला जातो. अगदी त्याचप्रमाणे विरोधकांना काही ठिकाणी जिंकू दिले जाते, जेणेकरून ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे असा भास निर्माण व्हावा.

विरोधी पक्षांनी आता वैयक्तिक अस्तित्वाचा विचार सोडून देश आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी या निवडणुकीत सहभागी होणे पूर्णपणे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले. आता दिपकेंच्या या भूमिकेवर विरोधी पक्ष काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.