Home देश ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का! TMC मध्ये उभी फूट, ५८ बंडखोर आमदारांनी...

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का! TMC मध्ये उभी फूट, ५८ बंडखोर आमदारांनी निवडला नवा नेता

0

मुंबई,दि.३: West Bengal Political Crisis : पश्चिम बंगालच्या राजकारणातून (Bengal Politics) एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. टीएमसीच्या तब्बल ५८ बंडखोर आमदारांनी (Rebel MLAs) पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी (Ritabrata Banerjee) यांना आपल्या विधिमंडळ पक्षाचे नेते (Legislative Party Leader) घोषित केले आहे.

या बंडखोर गटाने आज (३ जून) विधानसभा अध्यक्ष रतिंद्र बोस (Speaker Ratindra Bose) यांची भेट घेऊन आपल्या समर्थनाचे पत्र सादर केले. बंगाल निवडणुकीत टीएमसीने ८० जागा जिंकल्या होत्या, मात्र या बंडामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडे आता केवळ २२ आमदार उरले आहेत.

अभिषेक बॅनर्जी यांचे नेतृत्व नाकारले (Leadership Conflict)

बंडखोर गटाने अध्यक्षांना दिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनाच पक्षाध्यक्ष (Party President) मानले असले, तरी त्यांनी अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांचे नेतृत्व आणि विधिमंडळ पक्षाशी संबंधित निर्णय स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. पक्षांतर्गत चालणाऱ्या घरणेशाही किंवा विशिष्ट निर्णयांवरून हा वाद उफाळून आल्याचे दिसत आहे.

बंडखोर गटाची नवी कार्यकारिणी (Rebel Group Setup)

पक्षावर पकड मजबूत करण्यासाठी बंडखोर गटाने आपल्या नेत्यांची घोषणा केली आहे:

 विधिमंडळ पक्षनेते: ऋतब्रता बॅनर्जी

 उपनेते: जावेद खान, संदीपान साहा आणि सिउली साहा

 मुख्य प्रतोद (Chief Whip): अख्रुझमान

ममता बॅनर्जी यांची आक्रमक भूमिका: सर्व समित्या बरखास्त (Party Committee Dissolved)

पक्षात उभी फूट पडल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तातडीने पावले उचलत बुधवारी टीएमसीच्या सर्व राज्य समित्या (State Committees) आणि संलग्न संघटना तत्काळ प्रभावाने बरखास्त केल्या आहेत. आता संपूर्ण संघटनेची नव्याने पुनर्रचना (Organizational Restructuring) केली जाणार आहे.

दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी:

आमदार संदीपान साहा आणि ऋतब्रता बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, शोवनदेव यांना विरोधी पक्षनेते बनवण्याच्या प्रस्तावावर पक्षाने त्यांच्या बनावट सह्या (Forged Signatures) केल्या होत्या. या बनावट सह्यांची तक्रार त्यांनी अध्यक्षाकडे करताच, ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली.

बैठकीला ६० आमदारांची दांडी; पक्षाचा बचावात्मक पवित्रा (MLAs Absent In Meeting)

या राजकीय भूकंपाची नांदी रविवारीच पाहायला मिळाली होती. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील कालीघाट (Kalighat) निवासस्थानी दुपारी ३ वाजता आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, ८० पैकी चक्क ६० आमदार या बैठकला गैरहजर (60 MLAs Absent) राहिले. केवळ २० आमदारांच्या उपस्थितीमुळे ही बैठक पुढे ढकलावी लागली.

पक्षाचे स्पष्टीकरण:

यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत टीएमसी प्रवक्ते कुणाल घोष (Kunal Ghosh) यांनी सांगितले की, १ जून रोजी अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन (Statewide Protest) होते. सर्व आमदार त्या तयारीत व्यस्त असल्यामुळे त्यांनी अनुपस्थितीबाबत आधीच कळवले होते. तसेच, २ जून रोजी कोलकाताच्या एस्प्लेनेड भागात पक्षाचे प्रतिकात्मक धरणे आंदोलन नियोजित होते. मात्र, प्रत्यक्षात आमदारांची ही अनुपस्थिती बंडाची पूर्वतयारी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.