Solapur: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश

0

Solapur: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात आजपासून निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

सोलापूर,दि.१०: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Solapur) वाढतच असून त्याबरोबरच ओमिक्रॉन (Omicron Variant) या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्याही राज्यात वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज (सोमवार) पासून अत्यावश्यक सेवा वगळून अन्य ठिकाणी निर्बंध पुन्हा कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (District Collector Milind Shambharkar) यांनी काढले आहेत.

कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे म्हटले आहे. शाळा बंद ठेवण्यासंदर्भात शिक्षण विभागानेही पत्रक काढून शाळांना आवाहन केले आहे.

नव्या आदेशात रात्री ११ ते पहाटे पाचपर्यंत जमावबंदी राहणार असल्याचे म्हटले आहे. शासकीय व खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची अट घातली आहे. लसीकरण पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहता येणार आहे.

लग्नसमारंभ ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांची उपस्थिती ही अट पूर्वीप्रमाणेच कायम आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० लोकच उपस्थित राहू शकतील. जलतरण तलाव, स्पा, वेलनेस सेंटर, मनोरंजन पूर्णपणे बंद राहील. केश कर्तनालये व ब्युटीपार्लर सकाळी सात ते रात्री दहापर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील शॉपिंग मॉल्स ५० टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु येथे येणाऱ्यांना लसीकरणाची अट ठेवण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, सिनेमागृहे येथेही ५० टक्के क्षमतेची अट ठेवण्यात आली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी दोन्ही लसो किंवा ७२ तासांपूर्वीपर्यतची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक करण्यात आलो आहे. मालवाहतूक व बांधकामाच्या ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच परवानगी राहील, असे आदेशात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here