Textile Hub: सोलापुरात टेक्स्टाइल हब उभारण्यास केंद्र सरकार सकारात्मक: खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

1

टेक्स्टाइल हबसाठी १५० एकर जागेची गरज

सोलापूर,दि.४: Textile Hub In Solapur: यंत्रमाग उद्योगात अग्रेसर असलेल्या सोलापूर (Solapur) शहरात केंद्र सरकार (Central Government) टेक्स्टाइल हब (Textile Hub) उभारण्यास सकारात्मक असून यासाठी दीडशे एकर जागेची गरज असल्याचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी (Dr. Jaisiddeshwar Shivacharya Mahaswami) यांनी सांगितले. पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर शेळगीतील शिवयोग धाम येथे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी पत्रकारांचा सत्कार केला.

पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर शेळगीतील शिवयोग धाम येथे डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य (Dr. Jaisiddeshwar Shivacharya Mahaswami) यांनी पत्रकारांचा सत्कार केला.

त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, वस्त्रोद्योगाला दिलासा देण्यासाठी या उत्पादनावर साडेबारा टक्क्यांपर्यंत वाढवलेला जीएसटी कमी करून पाच टक्क्यांवर आणला आहे. टेक्स्टाइल हबसाठी लागणाऱ्या १५० एकर जागेबाबत आपले जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर हे धार्मिक पर्यटनाचे केंद्र व्हावे यासंदर्भात संसदेमध्ये मागणी केली असून भुईकोट किल्ल्यासह हत्तरसंग कुडल येथील श्री हरिहरेश्वर मंदिराच्या विकासासाठी पुरातत्त्व विभागाला निधी मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, उद्योजक महादेव कोगनुरे आदी उपस्थित होते. प्रारंभी सिध्दय्या स्वामी हिरेमठ यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत केले. पंचप्पा मेणसे यांनी सूत्रसंचालन केले.


1 COMMENT

  1. खा.महास्वामीजी,
    टेक्स्टाईल हब साठी केंद्र सरकारात्मक असेल आणि त्यासाठी 150 एकर जमीन हवी असेल तर मोहोळ तालुक्यातील कामती(खुर्द,बुद्रुक), परमेश्वर पिंपरी, दादपूर,शिंगोली या 4-5 गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी 500 एकराहून अधिक माळरान जमीन आहे. हे ठिकाण आपल्याच मतदारसंघात आहे. रत्नागिरी-नागपूर व पुणे विजयपूर महामार्गालगत, शिवाय सोलापूर शहर हद्दीपासून अवघ्या 7-8 किमी अंतरावर आहे.आपल्या मनात आले तर ही जमीन उपलब्ध करुन देणे आपणास सहज शक्य होईल.

    असे कांंही प्रकल्प शहराभोवतीच्या ग्रामीण भागात आणले तर शहरावरचा ताण कमी होऊन त्या त्या परिसरात सम्रुद्धी नांदेल याचा लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here