कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूर करीता काढले आदेश

0

सोलापूर,दि.२८: सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहराकरिता प्रतिबंधात्मक आदेश (Restrictions in Solapur) यापूर्वीच काढले आहेत. आता त्यानंतर आयुक्तांनी सुधारित आदेश काढले आहेत. सोलापूर शहर हद्दीत दि. २५/१२/२०२१ चे मध्यरात्री ००.०० पासून सामाजिक, धार्मिक, राजकीय, व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थितीबाबत खालीलप्रमाणे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत (Restrictions in Solapur)

१. लग्न समारंभासाठी अथवा सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमासाठी बंदिस्त सभागृहामध्ये एकावेळी उपस्थितीची संख्या १०० च्या वर नसेल व खुल्या जागेत २५० च्या वर नसेल किंवा जागेच्या क्षमतेच्या २५% यापैकी जे कमी असेल ते..

२. उपरोक्त नमूद कार्यक्रमाव्यतिरिक्त बंदिस्त ठिकाणी स्थायी स्वरूपाची बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी संबंधित प्राधिकरणाकडून अनुद्येय असलेल्या क्षमतेच्या ५०% पेक्षा जास्त नसेल तसेच ज्या ठिकाणी स्थायी स्वरूपाची व्यवस्था नाही क्षमतेच्या २५% क्षमतेपेक्षा जास्त नसेल इतक्या उपस्थिस परवानगो असेल.

३. क्रिडा स्पर्धा, खेळांचे संमारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या केवळ २५% परवानगी असेल.

ज्याअर्थी सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/संस्था/ संघटना या दंडास पात्र असणार आहेत. त्याअर्थी उपरोक्त दंडात्मक होणारी कारवाई टाळण्यासाठी संबंधित जागेच्या मालकांनी / आस्थापनानी सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा भाडे तत्वावर देण्यापुर्वीी मनपाचे संबंधित विभागीय कार्यालयाकडे र.रु. १०,०००/- इतकी रक्कम अनामत म्हणून जमा करावी, ज्यावेळी कार्यक्रम समाप्त होईल तेव्हा कोव्हिड १९ विषयक सर्व नियम व सुचनांचे पालन केले असल्याची खात्री झाल्यानंतरच सदरची अनामत रक्कम संबंधितास परत करण्यात येईल. अनामत रक्कम परत करण्यापुर्वी विभागीय अधिकारी यांनी पोलिस विभागाकडून काही कारवाई करण्यात आलेली नाही याची खात्री आगोदर करावी. याशिवाय संबंधित विभागीय अधिकारी यांनी त्या-त्या परिसराचे मुख्य आरोग्य निरिक्षक यांचे अधिनस्त आरोग्य निरिक्षकांची नियुक्त करून उपरोक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी जिओ टॅग फोटो व व्हिडीओ शूटिंग करून त्याबाबतचा अहवाल आपल्या विभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावा असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

एखादया व्यक्ती/संस्था/ संघटना यांच्याकडून कोरोना विषयक नियमावलीची पहिल्यांदा भंग झाल्यास अशा व्यक्ती/संस्था/ संघटना यांना र.रु.१०,०००/- इतके दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा नियमावलीचा भंग झाल्यास र.रू. १०,०००/- दंड व संबंधित आस्थापना १५ दिवसाकरीता सिल करण्याची कारवाई करण्यात येईल. तद्नंतर तिस-यांदा नियमावलीचा भंग झाल्यास र.रू.१०,०००/- दंड व पुढील आदेश हाईपर्यंत आस्थापना सिल करण्यात येईल.

मनपाचे संबंधित विभागीय कार्यालयाकडे रु.१०,०००/- अनामात रक्कम न भरता परस्पर जागा भाडयाने दिल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र धरून संबंधित आस्थापना विरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि विनियमानुसार कारवाई करणेत येईल. व्यक्ती/संस्था/संघटनाच्या आस्थापना विरूध्द विभागीय अधिकारी व अधिनस्त कर्मचारी यांनी कारवाई करावी असे आयुक्त पी शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here