MLC election result : विधानपरिषद निवडणूक, नागपूर आणि अकोल्यात भाजप विजयी

0

MLC election result : अकोलामध्ये विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले असून अकोल्याची जागा ही भाजपने जिंकली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे देखील विषयी झाल्यामुळे नागपुरातही भाजपने आपलं स्थान मिळवलं. विधान परिषदेच्या अकोला – वाशिम – बुलढाणा या जागेचा निकाल (Akola Washim Buldhana MLC Election result) हाती आला आहे. या जागेवर भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांनी शिवसेनेचे गोपिकिशन बजोरिया यांचा पराभव केला आहे.

वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली आहेत तर गोपिकिशन बजोरिया यांना 334 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास मते फुटली असल्याचं दिसत आहे. भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी ही निवडणूक 110 मतांनी जिंकली आहे. या निवडणुकीत 31 मते अवैध ठरली आहेत.

नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विजयी

नागपूर विधान परिषद निवडणुकीत (Nagpur MLC election result) नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. तर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत.

मतमोजणीत 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली.महाविकास आघाडीची 16 मते फुटली तर भाजपला 44 अतिरिक्त मते मिळाली त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी चपराक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here