Home देश मान्सूनचे लवकर आगमन! केरळमध्ये ‘या’ तारखेला पावसाची चाहूल; हवामान विभागाचा अंदाज

मान्सूनचे लवकर आगमन! केरळमध्ये ‘या’ तारखेला पावसाची चाहूल; हवामान विभागाचा अंदाज

0
Monsoon 2026

नवी दिल्ली,दि.१६: Monsoon 2026 :देशभरातील शेतकरी (Farmers), हवामानतज्ज्ञ (Meteorologists) आणि सामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. यंदा नैर्ऋत्य मान्सूनचे (Southwest Monsoon) आगमन नेहमीपेक्षा लवकर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, २६ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता (Monsoon Arrival) आहे. (मान्सून २०२६) 

मागील वर्षांतील आगमनाचा कल (Weather Trends)

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, मान्सूनच्या आगमनामध्ये दरवर्षी बदल पाहायला मिळतात. २०२० मध्ये मान्सून अंदाजापेक्षा ४ दिवस आधी म्हणजेच १ जूनला दाखल झाला होता. २०२१ मध्ये तो ३ दिवस उशिरा (३ जून), २०२२ मध्ये २ दिवस उशिरा (२९ मे) आणि २०२३ मध्ये ४ दिवस उशिरा (८ जून) दाखल झाला होता.

पावसाळा हंगामाची अधिकृत सुरुवात (Monsoon 2026)

साधारणपणे देशात मान्सून १ जूनच्या सुमारास केरळमध्ये धडकतो. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे सरकत संपूर्ण देश व्यापतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत असणाऱ्या पावसाळी हंगामाची अधिकृत सुरुवात मान्सूनच्या केरळ प्रवेशापासून होते. यंदा लवकर आगमनामुळे कृषी क्षेत्राला (Agriculture Sector) खरीप हंगामाच्या नियोजनासाठी मोठा फायदा होणार आहे.

हवामान विभागाने (IMD News) जरी २६ मे ही संभाव्य तारीख (Probable Date) सांगितली असली, तरी मान्सूनचा प्रत्यक्ष प्रवेश ४ दिवस आधी किंवा ४ दिवस उशिराही (Model Error) होऊ शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.