Home राजकारण गॅस दरवाढीविरोधात सोलापुरात ठाकरे गटाचे ‘चूल पेटवा’ आंदोलन; मोदींना पाठवणार भाकरी!

गॅस दरवाढीविरोधात सोलापुरात ठाकरे गटाचे ‘चूल पेटवा’ आंदोलन; मोदींना पाठवणार भाकरी!

0

सोलापूर,दि.६: केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या गॅस दरवाढीचा (Gas Price Hike) निषेध करण्यासाठी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (Shiv Sena UBT) पक्षाच्या वतीने सोलापुरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी भररस्त्यात चूल पेटवून आणि भाकरी भाजून सरकारचा निषेध केला. विशेष म्हणजे, या आंदोलनात महिला आघाडीने तयार केलेल्या भाकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठवण्यात येणार आहेत.

नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार घोषणाबाजी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शरणराज केंगनाळकर, महानगरप्रमुख महेश धाराशिवकर आणि महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगल थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पंतप्रधानांना पाठवणार भाकरी

गॅसच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. याचा निषेध म्हणून महिला आघाडीने चूल पेटवून त्यावर भाकरी भाजल्या. “जनतेची उपासमार होत असताना सरकार गॅसचे दर कमी करत नाही, त्यामुळे या भाकरी आम्ही पंतप्रधान मोदींना पाठवून त्यांचा निषेध नोंदवत आहोत,” अशी भूमिका महिला पदाधिकाऱ्यांनी मांडली.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या आंदोलनात (Protest) दत्ता गणेशकर, संजय पौळ, खंडू सलगरकर, राजाभाऊ कुसेकर, बाबू राठोड, सदाशिव सलगर, शिवा माळी, सुशील उपलप, तुषार खंदारे, कृष्णा सुरवसे, संदीप बेळमकर, आबा सावंत, महमद मुलानी, राकेश माळकोटे, दिनेश चव्हाण यांच्यासह स्वाती रुपनर, प्रभावती यलगुंडे, विद्या घोडके आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.