सोलापूर,दि.१: भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत कधीही न घडलेला एक क्रांतिकारी बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच घडवून आणण्याची शक्यता आहे. यापुढे देशाचे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय बंद दाराआड होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत नाही, तर थेट जनतेच्या दरबारात म्हणजेच ‘युट्यूब पोल’ (YouTube Poll) द्वारे घेतले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
काय आहे ही नवीन डिजिटल रणनीती?
• थेट लोकशाहीचा प्रयोग: सरकारला एखादा नवीन कायदा आणायचा असेल किंवा बजेटमध्ये बदल करायचा असेल, तर पंतप्रधान त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर एक ‘पोल’ टाकतील. ज्या पर्यायाला जास्त मते मिळतील, तोच निर्णय अंतिम मानला जाईल.
• कॅबिनेट मंत्र्यांचे काय होणार?: या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता मंत्र्यांच्या सल्ल्यापेक्षा सर्वसामान्यांच्या ‘क्लिक’ला जास्त महत्त्व मिळणार असल्याने प्रशासकीय कामात मोठी क्रांती अपेक्षित आहे.
• ‘मन की बात’ आता ‘जनतेची साथ’: संसदेत चर्चा करण्यापूर्वीच जनतेचा कल समजून घेण्यासाठी हे सर्वात मोठे डिजिटल व्यासपीठ ठरेल, असे बोलले जात आहे.
विरोधकांमध्ये गोंधळ आणि चर्चा
या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, यामुळे डिजिटल इंडिया मोहिमेला एक वेगळीच उंची मिळणार आहे. मात्र, इतका मोठा निर्णय अचानक कसा काय घेतला जाऊ शकतो, याबाबत तज्ज्ञांमध्ये सस्पेन्स कायम आहे.
लक्ष द्या: जर ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, तर नक्कीच तुम्ही या बातमीचे लक्ष्य ठरला आहात! आज ‘१ एप्रिल’ म्हणजेच ‘एप्रिल फूल’ आहे. ही बातमी पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी तयार केली आहे.








