दुबईत अडकला या पक्षाचा खासदार; महाराष्ट्रातील हजारो पर्यटकांचाही खोळंबा

0

जालना,दि.२: इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे आखाती देशांमधील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका परदेशात गेलेल्या भारतीयांना बसला असून, दुबईत अडकलेले महाराष्ट्रातील नेते आणि पर्यटक आता मायदेशी परतण्यासाठी मदतीची विनंती करत आहेत. यामध्ये जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांचाही समावेश आहे.

खासदार डॉ. कल्याण काळे दुबईत अडकले

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. कल्याण काळे हे दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त दिल्लीहून दुबईला गेले होते. मात्र, युद्धसदृश परिस्थितीमुळे विमान उड्डाणे स्थगित झाल्याने ते तिथेच अडकून पडले आहेत. खासदार काळे सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती त्यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी दिली आहे. जालन्यातील इतर सात नागरिकही आखाती देशात अडकले असून, त्यापैकी पाच जण दुबईत तर दोन जण अबूधाबीत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.

राज्यातील ५० हजार यात्रेकरूंची चिंता वाढली

केवळ पर्यटन किंवा कामानिमित्त गेलेले नागरिकच नव्हे, तर उमराह यात्रेसाठी मक्का-मदीना येथे गेलेले राज्यातील हजारो भाविकही सध्या तिथे अडकून पडले आहेत. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या नागपूरमधील सुमारे २,२०० लोक विमानसेवेतील अडचणींमुळे अडकले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ५०,००० लोक या यात्रेसाठी गेले असून, त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारशी समन्वय साधून प्रयत्न करत आहे.

या संदर्भात सर्व ट्रॅव्हल एजंटना पत्र लिहून यात्रेला गेलेल्या लोकांची नावे आणि माहिती तातडीने मागवण्यात आली आहे. आखाती देशातील तणाव निवळल्यानंतरच विमानसेवा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार; हजारो पर्यटकांचाही खोळंबा

जालना: इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे आखाती देशांमधील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका परदेशात गेलेल्या भारतीयांना बसला असून, दुबईत अडकलेले महाराष्ट्रातील नेते आणि पर्यटक आता मायदेशी परतण्यासाठी मदतीची विनंती करत आहेत. यामध्ये जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांचाही समावेश आहे.

खासदार डॉ. कल्याण काळे दुबईत अडकले

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. कल्याण काळे हे दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त दिल्लीहून दुबईला गेले होते. मात्र, युद्धसदृश परिस्थितीमुळे विमान उड्डाणे स्थगित झाल्याने ते तिथेच अडकून पडले आहेत. खासदार काळे सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती त्यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी दिली आहे. जालन्यातील इतर सात नागरिकही आखाती देशात अडकले असून, त्यापैकी पाच जण दुबईत तर दोन जण अबूधाबीत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.

राज्यातील ५० हजार यात्रेकरूंची चिंता वाढली

केवळ पर्यटन किंवा कामानिमित्त गेलेले नागरिकच नव्हे, तर उमराह यात्रेसाठी मक्का-मदीना येथे गेलेले राज्यातील हजारो भाविकही सध्या तिथे अडकून पडले आहेत. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या नागपूरमधील सुमारे २,२०० लोक विमानसेवेतील अडचणींमुळे अडकले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ५०,००० लोक या यात्रेसाठी गेले असून, त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारशी समन्वय साधून प्रयत्न करत आहे.

या संदर्भात सर्व ट्रॅव्हल एजंटना पत्र लिहून यात्रेला गेलेल्या लोकांची नावे आणि माहिती तातडीने मागवण्यात आली आहे. आखाती देशातील तणाव निवळल्यानंतरच विमानसेवा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here