राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या निधनानंतर मोठा निर्णय 

0

मुंबई,दि.३०: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.२८) विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर काल (दि.२९) अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. राज्यात या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रवादीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने झेडपी निवडणुकीचा प्रचार थांबवला असून, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे प्रचार थांबवण्यात आला आहे. यानुसार राष्ट्रवादी प्रचारसभा, रोड शो घेणार नाही. मतदारांना केवळ पत्रके वाटून प्रचार केला जाणार असून, उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी, पक्षाच्या उमेदवारांना सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय निवडून आल्यांनतर कुठलाही मिरवणूक काढली जाणार नाही असंही एकमतानं ठरवण्यात आलं आहे. 

निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यामध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही तोंडावर आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here