पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘तो’ फोटो शेअर करत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

0

नवी दिल्ली,दि.२८: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान बारामती येथे कोसळले. या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील बारामती येथे लँडिंग करताना विमान कोसळले. अजित पवार निवडणूक प्रचारासाठी बारामतीला गेले होते. विमानाच्या क्रॅश-लँडिंगमधील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. की घटनेनंतर खाजगी चार्टर्ड विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य कार्यकर्त्यांप्रति शोकसंवेदना. ॐ शांती., असे पंतप्रधान मोदी यांनी शोक संदेशात म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी विमान महाराष्ट्रातील बारामतीजवळ कोसळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. जिल्हा परिषद निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here