सोलापूर,दि.28: सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur Pune Highway) भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. टँकर आणि ट्रकचा भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले (5 killed on the spot) असून सहा जणांचा गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उजनी धरणाच्यासमोर भिमानगर इथं हा अपघात घडला.
सध्या भीमा नदी पुलावरून रोडचं काम सुरू आहे. त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक या मार्गावर सुरू आहे. अशात वाहन चालकाला अंदाज न आल्याने अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सहा जणांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हेही वाचा कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. इंदापूरकडून सोलापूरकडे टॅंकर जात असताना सोलापूरकडून पुण्याला येणाऱ्या ट्रकसोबत हा भीषण अपघात झाला आहे. अगदी उजनी धरणाच्या समोर एका ढाब्याजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु असल्याची माहिती आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मळीचा टँकर (एम. एच. 14 / सी.पी. 4020) हा इंदापूरहूनसोलापूरकडे निघालेला होता. सोलापूर हद्दीतील माढा तालुक्यात भीमा नगर येथे एका पुलाजवळ सरदारजी ढाब्यासमोर हा टँकर आला असता समोरुन येणारा तांदळाचा ट्रक (एम.एच.25 / यू 4045) रस्ता दुभाजकाला धकडून समोरून येणा-या या टँकरवर जोरदार आदळला.
भीषण अपघातात मळीच्या टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक पलटी होऊन चालकाच्या केबीनमधे बसलेले पाचजण जागीच ठार झाले. ट्रकमधील लहान मुलं आणि स्त्रीयांसह तीनजण जखमी झाले असून त्यांना इंदापूर जवळील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातातील ट्रक हा सोलापूरमधून तांदळाची गोणी घेऊन मुंबईकडे निघालेला होता. या अपघातात दोन लहान मुले, महिला जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असून इंदापूर जवळील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.