MP Imran Masood: ‘जर गोंधळ घालणारे मुस्लिम असते तर…’  खासदार इम्रान मसूद

0

सोलापूर,दि.१२: उत्तर प्रदेशातील फतेहपूर मकबरा-मंदिर वादावरून काँग्रेस खासदार इम्रान मसूद (MP Imran Masood) यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मकबरास्थळाच्या आतील व्हिडिओंमध्ये हिंसाचार स्पष्टपणे दिसतो, परंतु पोलिसांनी आरोपी भाजपा जिल्हाध्यक्ष आणि हिंदुत्व संघटनेच्या नेत्यांवर कोणतीही कठोर कारवाई केली नाही. त्यांच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला नाही. जर दंगलखोर मुस्लिम असते तर त्यांना छातीत गोळ्या झाडण्यात आल्या असत्या. (MP Imran Masood On Tomb-Temple Controversy)

काय आहे मकबरा-मंदिर वाद? MP Imran Masood

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये नबाव अब्दुल समद मकबऱ्यावरुन वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हिंदू संघटना सोमवारी हा मकबरा तोडण्यासाठी पोहोचल्या. हिंदू संघटनांचा दावा आहे की, हजारो वर्षापूर्वी इथे भगवान शिव आणि श्रीकृष्णाचं मंदिर होतं. प्रशासनाने मकबऱ्याच्या सुरक्षेसाठी बॅरिकेडींग लावलेलं. पण गर्दीसमोर या सर्व उपायोजना कमी पडल्या. हा सर्व वाद शिव मंदिर आणि मकबऱ्यावरुन आहे. हिंदू संघटनांनी इथे शिव आणि श्रीकृष्ण मंदिर असल्याचा दावा केला आहे. 

अन्यथा, येणाऱ्या पिढ्यांना… इम्रान मसूद 

इम्रान मसूद म्हणाले की, अराजकता/तोडफोड केल्यानंतर, ते आता “प्रकरण सौहार्दपूर्णपणे सोडवण्याबद्दल” बोलत आहेत. सध्या तरी, आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी समाजात द्वेष पेरू नये. अन्यथा, येणाऱ्या पिढ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. अशा राजकारणामुळे समाज विभागला जाईल. 

दरम्यान, सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, फतेहपूरमध्ये घडलेली घटना भाजपच्या वेगाने घसरणाऱ्या लोकप्रियतेचे लक्षण आहे. जेव्हा जेव्हा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पर्दाफाश होतो तेव्हा तेव्हा सलोखा बिघडवण्याचे षड्यंत्र रचले जाते. जनतेला आता भाजपची ही युक्ती समजली आहे. आता जनता अशा कृत्यांमध्ये अडकणार नाही किंवा या घटनांमुळे त्यांची दिशाभूल होणार नाही. या घटनेतील गुन्हेगार लखनऊच्या ड्रोनने ओळखतील की दिल्लीतील लोकांच्या ड्रोनने, अखिलेश यादव म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here