सोलापूर,दि.२३: Kumar Ashirwad On Solapur Airport सोलापूर विमानतळाबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. होटगी रोड विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र या विमानतळावर नाईट लैंडिंगची अडचण येत आहे. असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
बोरामणी येथील आंतराष्ट्रीय विमानतळासाठी यापुर्वी भूसंपादन प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. याशिवाय अतिरीक्त जमिन संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. येथील सुमारे ३२ हेक्टर क्षेत्र हे माळढोक अधिवास क्षेत्र आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार यासाठीची आवश्यक प्रक्रिया प्रशासनाकडून सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या भेटीत प्रामुख्याने होडगी रोड विमानतळ, बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पंढरपूर कॉरिडॉर बाबत चर्चा झाली.
विमानतळावर नाईट लैंडिंगची अडचण येत आहे | Kumar Ashirwad On Solapur Airport
होटगी रोड विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र अन्य शहरांसाठी विमानसेवा सुरु करण्यासाठी या विमानतळावर नाईट लैंडिंगची अडचण येत आहे. त्यामुळे बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाईट लैंडिंगची सुविधा करण्याचा पर्याय समोर आला असून त्यादृष्टीने कामकाज सुरू करण्यात आले आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या गोव्याची विमानसेवा सुरळित आहे. १५ ऑगस्ट पर्यंत सोलापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र प्रवासी विमानसेवेत नाईट लेंडिंग प्रमुख अडचण ठरत आहे. याशिवाय येथील विमानतळावरील अतिक्रमण हटविणे, न्यायालयीन प्रकरणे यामुळे ही सुविधा उभारणे खर्चिक व वेळखाउ बनली आहे. त्यामुळे बोरामणी येथील विमानतळावर नाईट लैंडिंगची सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत येत असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.