Pankaja Munde | मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

0

सोलापूर,दि.८: भाजपा नेत्या राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास शनिवारी भेट देत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

यावेळी  बोलताना त्यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भुतलावरील एक आध्यात्मिक नंदनवन असल्याचे मत व्यक्त केले. स्वामींच्या दर्शनानंतर मंदिर समितीच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे (Mahesh Ingale) यांनी  पंकजा मुंडे यांचा श्रीस्वामींचे कृपावस्त्र, प्रतिमा व प्रसाद देऊन सत्कार केला.

आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रथमेश इंगळे, शिवशरण जोजन, मोतीराम राठोड, महेश हिंडोळे, आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी, समर्थ स्वामी, तुषार मोरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here