मंगळवारपासून उद्धव ठाकरे प्रचाराचा शुभारंभ करणार

0

मुंबई,दि.2: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे हे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत. ठाकरे यांचा सहा दिवसांचा दौरा शिवसेनेने आज जाहीर केला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून दौऱ्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून (UBT) अमर पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माने यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर करूनही एबी फॉर्म दिला नाही. उद्धव ठाकरे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूर दक्षिण आणि सांगोला येथे सभा घेणार आहेत. याबाबत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी माहिती दिली.

10 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे दक्षिण सोलापूर आणि सांगोला दौऱ्यावर असणार आहेत. 

मंगळवार  5 नोव्हेंबर   दुपारी 12.30 वाजता   राधानगरी विधानसभा (अदमापूर)

                            सायंकाळी 6 वाजता     रत्नागिरी (रत्नागिरी व राजापूर विधानसभा)

बुधवार 6 नोव्हेंबर      दुपारी 3 वाजता          भिवंडी ग्रामीण विधानसभा

                            सायंकाळी 7 वाजता     बीकेसीतील महाविकास आघाडीची सभा

गुरुवार 7 नोव्हेंबर      दुपारी 1 वाजता          दर्यापूर विधानसभा

                           दुपारी 3 वाजता         तिवसा विधानसभा

                           सायंकाळी 4 वाजता     बडनेरा विधानसभा

                           सायंकाळी 7 वाजता     बाळापूर विधानसभा

शुक्रवार 8 नोव्हेंबर     दुपारी 3 वाजता           बुलढाणा विधानसभा

                            सायंकाळी 5 वाजता     मेहकर विधानसभा

                            सायंकाळी 7 वाजता     परतूर विधानसभा

शनिवार 9 नोव्हेंबर     दुपारी 3 वाजता           हिंगोली (हिंगोली, कळमनुरी विधानसभा)

                           सायंकाळी 7 वाजता     परभणी (परभणी व गंगाखेड विधानसभा)

रविवार 10 नोव्हेंबर    दुपारी 3 वाजता          सांगोला विधानसभा

                            सायंकाळी 7 वाजता    सोलापूर दक्षिण विधानसभा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here