सोलापूर,दि.23: माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांना शिवसेनेने (ठाकरे गट) बार्शी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. दिलीप सोपल आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात लढत होणार आहे. सोपल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत ‘कहो दिलसे दिलीप सोपल फिरसे’ अशा घोषणा दिल्या. दिलीप सोपल यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मनोज जरांगे यांच्याबद्दल म्हणाले…
निवडणुकीला सामोरं जाताना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो असल्याचे दिलीप सोपल म्हणाले. तिनही पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही त्यांनी सांगितली. दरम्यान, मनोज जरांगे पाटलांबददल खूप मोठी सहनभूती असणारा बार्शी मतदारसंघ आहे. मी सुरुवातीपासून त्यांना पाठींबा दिला आहे. ते मला पाठींबा देतील का? हे मी सांगू शकत नाही असंही सोपल म्हणाले. मात्र, त्यांच्या उमेदवारांचा नक्कीच फटका बसू शकतो असेही सोपल म्हणाले.