सोलापूर,दि.२१: सोलापूर बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे मंगळवार २३ नोव्हेंबर रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ‘श्री’ स नित्यपूजा, अभिषेक, आरती, महानैवज्ञ आदि धार्मिक हिची आयोजन करण्यात आले आहे. पूजेनंतर गणेश भक्तांसाठी श्री’ चे दर्शन दिवसभर खुले राहील. अंगारकीनिमित्त विशेष सजावट करण्यात येणार आहे.
चंद्रोदय रात्री ९ वाजून ०६ मिनिटांनी आहे. यावेळेस श्री’ ची महाआरती होणार आहे. तद्नंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येईल. गणेश उपासनेत चतुर्थीला महत्त्व आहे. त्यातही मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अर्थातच अंगारकी चतुर्थीचे महत्व विशेष आहे.
हिंदू धर्मात व्रत-वैकल्याचा महिना म्हणून माघ अर्थात मार्गशीष महिना महत्त्वपूर्ण आहे. या पवित्र महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आला असून सद्भक्तांनी या शुभदिनी गणेशाचे दर्शन घेऊन आशिर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे व उत्सव अध्यक्ष पुष्कराज मेत्री यांनी केले आहे.