सोलापूर,दि.3: फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केली व आरोपीविरुद्ध पुरावा मिळून येत नाही त्यामुळे आरोपीस मुक्त करावे असा ब फायनल अंतिम अहवाल संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दाखल करूनसुद्धा फिर्यादीतर्फे तिचे कथन खरे आहे, यापृष्ठयर्थ पाच साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने ऑर्केस्ट्रा आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायणपेठकर रा. सोलापूर याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी आज पुन्हा दुसऱ्यांदा फेटाळला.
यात हकिकत अशी की, पिडीता हि कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर येथे आली होती. त्यावेळी पिडीता हि तिचे भावाला अंगठी खरेदी करिता आरोपीचे नारायणपेठकर ज्वेलर्स मध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीने पिडीतेची खाजगी माहिती व कोठून आला आहात अशी माहिती विचारली.
त्यावेळी पिडितेने त्यास मी आँर्केस्टा आर्टिस्ट असून काम शोधत असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने पिडितेस माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे, असे म्हणून पिडीतेसोबत सलगी वाढवली व पिडीतेचा मोबाईल नंबर मागून घेतला. तदनंतर आरोपी हा पिडीतेसोबत फोनवरून बोलणं सुरु झाले.
तदनंतर पुन्हा पिडीता हि सोने खरेदी करण्यासाठी आरोपीचे दुकानात गेली त्यावेळी तिने सोने खरेदी केले व पिडितेने आँनलाईन पेमेंट पाठवले व तेथून निघून गेली.
तदनंतर त्याच दिवशी आरोपीने पिडीतेस सांयकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सांयकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले. त्यामुळे पिडीता हि रिक्षाने त्याठिकाणी बार्शी रोडवरील एका लाँजवर गेली.
त्याठिकाणी आरोपीने पिडीतेवर तिचे ईच्छेविरूध्द जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदुक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलेस तुला ठार मारेल अशी धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद पिडितेने आरोपीविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केली.
सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायणपेठकर यास दि.31/5/2024 रोजी अटक केली असून त्याचा पहिला जामीन अर्ज फेटाळला होता व तो न्यायालयीन कोठडीत आहे.
पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध पुरावा मिळून येत नाही, फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, घटना घडली तेंव्हा ती घटनास्थळावर नव्हती, आरोपीही घटनास्थळावर नव्हता, असा अहवाल न्यायालयात दाखल करून आरोपीस मुक्त करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे आरोपींने दुसऱ्यांदा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
यात मुळफिर्यादीतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी फिर्यादीने फिर्यादीत कथन केलेली घटना खरी असल्याचे दर्शविणारे पाच साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तिवाद दाखल करून पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीला मदत होईल असा तपास केल्याचे व पोलिसांनी फिर्यादीतर्फे आलेल्या साक्षीदारांचे जवाब नोंदविण्याचे टाळून फिर्यादीलाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून देऊन आरोपीचे जामीन अर्जास तीव्र विरोध केला.
सरकार पक्षातर्फे अॅड. दत्तूसिंग पवार यांनी युक्तिवाद करताना आरोपी हा धनदांडगा सावकारी व सराफ व्यवसायिक असून जामीन नामंजूर करण्याची मागणी केली. सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
यात मुळफिर्यादीतफे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रुपनर,अॅड. शैलेश पोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. दत्तूसिंग पवार यांनी तर आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले.