शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

0

मुंबई,दि.20: शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. 12 जुलै रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि.18) विधान परिषदेतील 11 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

विधान परिषदेतीच्या उमेदवाराला विधानसभेचे आमदार मतदान करत असतात. 25 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 12 जुलै रोजी मतदान व त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. मात्र, यानिवडणुकीआधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच धक्का दिला आहे.

आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे.

आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, असं असतानाही विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा  शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठीच्या  निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here