लोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यातील 93 जागांवर मतदान सुरू

0

सोलापूर,दि.7: देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांवर आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि राजौरी मतदारसंघातील निवडणुका 25 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील सोलापूर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह अकरा मतदारसंघांत मतदान सुरू आहे. सोलापुरात अनेक नवमतदारांनी प्रथमच मतदान केले. सोलापुरात ओम बेडगे या युवकाने तरूणांनी मतदान करावे असे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झाले होते. त्यामागे उष्णतेची लाट हे एक कारण होते. सोलापूर लोकसभा मतदार संघात सकाळी 11 पर्यंत 16.17 टक्के मतदान झाले आहे. तर माढा लोकसभा मतदार संघात 15.27 टक्के मतदान झाले आहे.

सोलापूर लोकसभा
माढा मतदारसंघ

सोलापूर, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, लातूर, धाराशीव व अन्य काही जिह्यांत वेधशाळेने 7 मे रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी आज अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केले, मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात, 543 पैकी अर्ध्याहून अधिक जागांवर मतदान होईल. सुरतची जागा भाजपने बिनविरोध जिंकली कारण निवडणूक आयोगाने काँग्रेस उमेदवाराचे अर्ज फेटाळले आणि इतर उमेदवारांनीही माघार घेतली.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कुटुंबासह अहमदाबादमधील मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. मतदान केल्यानंतर अमित शहा यांनीही मंदिरात जाऊन प्रार्थना केली.

दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी अहमदाबादमधील प्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. 

हावेरी येथे मतदान केल्यानंतर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि हावेरी येथील भाजपचे उमेदवार बसवराज बोम्मई म्हणाले, “लोकांना या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मी बाहेर पडण्याचे, मतदान करण्याचे आवाहन करतो.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here