ATS ची गुजरातमध्ये मोठी कारवाई, 600 कोटींचे हेरॉईन केले जप्त

0

गांधीनगर,दि.15: गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (Gujarat ATS) मोठी कारवाई करण्यात आली आहे. ATS ने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात शेकडो कोटींचं ड्रग्ज जप्त केले आहे. विशेष म्हणजे ही कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो नाही तर गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पाठोपाठ आता गुजरातमध्ये (Gujarat) देखील ड्रग्ज तस्करांविरोधात (Drugs Peddler) धडाकेबाज कारवाई सुरु आहे. गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातून शेकडो कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) नाही तर गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (Gujarat ATS) करण्यात आली आहे. या कारवाईत एटीएसने तब्बल 600 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे.

संबंधित कारवाई ही मोरबी जिल्ह्यातील जांजुरा गावात करण्यात आलीय. तसेच याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुजरातचे कॅबिनेट मंत्री हर्ष सांगवी यांनी ट्विटरवर या कारवाईबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे ड्रग्ज पाकिस्तानातून आणला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

डिजीपी आशिष भाटीया यांनी प्रसारमाध्यमांना या कारवाईबाबत माहिती दिली आहे. “या कारवाईत एटीएसने 120 किलो हेरॉईन पकडली आहे. त्याची किंमत 600 कोटी रुपये आहेत. एटीएसने या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी इतक्या मोठ्या प्रमाणातील हेरॉईन हे सागरी मार्गाने आणले होते. आरोपींना या हेरॉईनची पाकिस्तानी बोटीतून डिलिव्हर मिळाली होती, असं प्राथमिक तपासातून समोर येत आहे”, अशी माहिती डिजीपी भाटीया यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here