सोलापूर,दि.3: MS Dhoni Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग पार्टीत जामनगरमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसला. तो आकाश अंबानीसोबत दांडिया खेळताना दिसला होता. धोनीसोबत क्रिकेट जगतातील अनेक स्टार्सही उपस्थित होते. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एमएस धोनी त्याच्या चेन्नई सुपर किंग्जचा माजी सहकारी डिजे ब्रावोसोबत नृत्याचा आनंद लुटताना दिसला. धोनीची पत्नी साक्षीनेही या डान्समध्ये सहभाग घेतला. माजी भारतीय कर्णधार या कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सलमान खान आणि रणवीर सिंग सारख्या काही शीर्ष बॉलीवूड स्टार्सशी संवाद साधताना दिसला. या कार्यक्रमादरम्यान धोनीने तेलुगू चित्रपट स्टार राम चरण यांच्याशीही संवाद साधला.
महेंद्रसिंग धोनी हा अतिशय लाजाळू आणि कमी बोलणारा माणूस म्हणून ओळखला जातो पण मजा करताना तो कोणाच्याही मागे नाही. जामनगरमध्ये आनंद अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी समोर आलेला व्हिडिओ आश्चर्यकारक आहे. तीन दिवसीय कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी महेंद्रसिंग धोनीने अंबानी कुटुंबासोबत डान्स करत आपली खास स्टाइल दाखवली जी याआधी कधीही न पाहिलेली होती.
महेंद्रसिंग धोनीचा डान्स | MS Dhoni Video
मिस्टर कूल महेंद्रसिंग धोनी जो कधी त्याच्या लूकमुळे तर कधी त्याच्या हेअरस्टाइलमुळे चर्चेत राहतो. सध्या अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील दांडियामुळे चर्चेत आहेत. धोनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासोबत हातात दांडिया घेऊन नाचताना दिसला. आकाश अंबानीही त्याला दांडियाबद्दल काही गोष्टी सांगताना दिसला.