Basavraj Patil काँग्रेसचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार

0

लातूर,दि.27: Basavraj Patil: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. आता आणखी एक मोठा नेता भाजपात प्रवेश करणार आहे. लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री, काँग्रस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपल्या काँग्रेस सदस्याचा राजीनामा दिला आहे. बसवराज पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

लिंगायत समाजाचे नेते बसवराज पाटील यांची काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख होती. त्यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बसवराज पाटील यांच्याकडून अद्याप पर्यंत पक्षप्रवेशाची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आपल्या समर्थकासह बसवराज पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहेत बसवराज पाटील? | Basavraj Patil

बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याच्या मुरूमचे रहिवासी आहेत. 2009 आणि 2014 अशा दोन निवडणुकांमध्ये त्यांनी औसा मतदार संघातून निवडणुक लढवली आणि येथून विजयी देखील झाले होते. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये काँग्रेसने त्यांना राज्यमंत्रीपद दिले. 2019  मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here