नांदेड,दि.२४: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. यानंतर त्यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिली. निवडणूक बिनविरोध झाल्याने त्यांची खासदारपदी वर्णीही लागली. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ५५ हून अधिक माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे.
नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथेच चव्हाण यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अशोक चव्हाण म्हणाले, ‘पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी आज विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.’
अशोक चव्हाण म्हणाले, “नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो.”