सोलापूर,दि.३१: सकल मराठा समाज जुळे सोलापूरच्या वतीने सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या राजीनामाची मागणी करीत जुळे सोलापूर समाजाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सहा दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावली आहे, तरीसुद्धा सरकारला जाग आली नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत आज आमदार सुभाष देशमुख सोबत देशमुख यांच्या निवासस्थानी आंदोलन करून मराठा समाजातील तरुणांनी रोष व्यक्त केला.
यावेळी मराठा तरुणांनी सुभाष देशमुख यांना एकच प्रश्न विचारला की 50% मधून ओबीसी च्या कोट्यातून आरक्षण बाबत तुमची भूमिका काय आहे. याचे उत्तर द्यावं त्याचे उत्तर देताना सुभाष देशमुख यांनी अपेक्षित उत्तर दिले नाही, त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या निषेध करून मराठा तरुण संतापाचे भरत सुभाष देशमुख यांच्या विरोधात घोषणा देत निघून गेले.
जवाब दो आंदोलन
सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा जुळे सोलापूर यांच्या वतीने आज दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण संदर्भात जवाब दो आंदोलन करण्यात आले, आ. सुभाष देशमुख हे मराठा समाजाचे असूनही ते मूक गिळून गप्प आहेत, त्यामुळे आमदारांचा व राज्य सरकारचा निषेध करीत रोष व्यक्त करण्यात आला, यावेळी जुळे सोलापूर, मजरेवाडी सह हद्दवाढ भागातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सकल मराठा समाज जुळे सोलापुराचे सर्व मराठा समाज बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.